मुंबई येथे अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारक रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील पद्मदुर्ग
किल्ल्यावर उभारावे, अरबी समुद्रात सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपये खर्च करून राज्य सरकार
शिवस्मारक बांधणार आहे. पण या स्मारकाच्या उभारणीत अनेक अडथळे निर्माण होत
आहेत. हे स्मारक उभे राहिल्यास या भागातील मासेमारी बंद होऊन मच्छीमारांचा
व्यवसाय धोक्यात येणार आहे. यामुळे नियोजित शिवस्मारकासाठी सदर जागा योग्य
नाही. शिवस्मारक रायगड जिल्ह्यात उभारावे,(शिवसेना उपनेते आणि महाराष्ट्र कोळी समाज
संघाचे अध्यक्ष अनंत तरे )