एक गोष्ट लक्षात घ्या, मोदी हे  एक खोटं नाणं आहे, तुम्ही कोणताही व्यावहार करा तो फेल जाणार !

नोटाबंदीचा संपूर्ण फज्जा उडाला, यांना तसूभरही शरम नाही > जिएसटी अजूनही ताळ्यावर येत नाही (खरं तर जन्मात येणार नाही). संपूर्ण अर्थव्यवस्थेला घाण्याला जुंपलं गेलंय  आणि मुख्य म्हणजे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचं आयुष्य नाहक वाया जाणार आहे पण हे इतके निब्बर आहेत की यांना काहीएक फरक पडत नाही >  बुलेट ट्रेनमुळे देशावर १.१० लाख कोटींचा व्यर्थ बोजा पडला आहे आणि त्यासाठी सध्याच्या तरुण पिढीचं भविष्य गहाण ठेवलं गेलं आहे. त्या बुलेट ट्रेनचा न देशाला उपयोग न प्रवाशांना, पण यांना त्याची काहीएक पडलेली नाही > पटेलांचा ३ हजार कोटींचा पुतळा अत्यंत निर्बुद्धपणे उभा करून ठेवला आहे.  त्यामुळे पर्यटन वाढेल असा मूर्खयुक्तीवाद केला जातोयं पण ते असंभव आहे.  ध्रुव राठीचं उत्तम विश्लेषण इथे पाहा >  ध्रुव राठी    > आणि आता राफेल डील !


थोडक्यात, खोट्या नाण्यानं  वेगवेगळे व्यावहार करण्यापेक्षा नाणंच फेकून देणं योग्य ठरेल. 

आता तुमचा मुद्दा असा की राफेल डील सरकार > सरकार असं आहे. द वायरनं याचा सुरेख उहापोह  इथे केला आहे  >द वायर  . त्यांचा युक्तीवाद बिनतोड आहे. खरं तर फ्रान्स सरकारनं सार्वभौम हमी न देता, यातनं अंग काढून घेतलंय ही  एकच गोष्ट पुरेशी बोलकी आहे.