केंद्र सरकारने कायदा करून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्‍क्‍यांवरून वाढवून ७० टक्के करावी. आरक्षण मर्यादा वाढविल्याशिवाय मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी राज्य सरकार तोंडदेखले १६ टक्‍क्‍यांचे आरक्षण देत आहे, त्यामुळे राज्य सरकारला खरेच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांनी केंद्र सरकारकडे आरक्षण मर्यादा वाढविण्याचा आग्रह धरला पाहिजे, (भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर).