भीम आर्मी, बहुजन यूथ फॉर मिशन २०१९ यांसारख्या संघटना विरोधकांकडून पडद्यामागून चालवल्या जात आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन आमच्या भोळ्या-भाबड्या लोकांची दिशाभूल करीत आहेत, त्यांच्या भावनांशी खेळत आहेत,

या संघटना दलित वस्त्यांमध्ये जाऊन 'आम्ही मायावती यांना पंतप्रधान बनवणार असल्याचे सांगत आहेत.' माझे नाव सांगून ते लोकांकडून निधीही उकळत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते आमच्या लोकांना लोकांना उच्च जातीतील लोकांविरोधात भडकावत आहेत. त्यांच्या मनात द्वेष पसरवत आहेत. पक्षाच्या वाढीमध्ये या संघटना अडथळा ठरत आहेत. बसपा सर्व जातीधर्मांचा पक्ष आहे. या संघटना वैयक्तिक स्वार्थासाठी निर्माण झाल्या आहेत. (बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती)