बुजुर्ग डिफेन्स ऍनलिस्ट अजय शुक्ला आणि द वायरचे  संस्थापक एमके वेणू यांच्याशी हॅपीमॉन जेकबनी केलेली ही चर्चा कमालीची उद्बोधक आहे. 

या लोकांनी तारीख-वार कसा झोल झाला ते  सप्रमाण सांगितलं आहे. १२६ ची परस्पर ३६ जेटस करणं,  सीताबाईंची दिव्य वक्तव्यं आणि एकूणात डिपीपीचा मोदींनी उडवलेला धुव्वा याचं सुरेख विवरण खाली दिलेल्या क्लिपमधे आहे. 

अनील अंबांनींनी या क्लिपमुळे द वायर विरुद्ध ६ हजार कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे !  अर्थात, दावा दोन कारणांनी  पोकळ आहे >  १. अनील अंबानींसारख्या दिवाळखोर व्यक्तीची अब्रू इतकी कशी मोठी असू शकते ? आणि २.  द वायरकडे इतके सज्जड पुरावे आहेत की अंबानींना, उलट-दाव्याचे ६ हजार कोटी भरायला लागले नाहीत तर मिळवली !

द वायर