मोहन भागवत खुलेआम 'एके-47'सारख्या शस्त्रांची पूजा करतात. आमचे सरकार आले, की  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना तुरुंगात पाठवू', 'काँग्रेससोबत गेलो, तरीही एमआयएमला सोडणार नाही'.

'आगामी निवडणुकीमध्ये भाजपला दोन आकड्यांवर आणू.'

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटामध्ये अडकविण्याचा चुकीचा खेळ मोहन भागवत यांनी सुरू केला. आता या खेळाचा शेवट आता मीच करणार'. (प्रकाश आंबेडकर)

----------------

'भाजपसोबत सत्ता उपभोगायची आणि त्यांच्यावर टीका करायची अशी शिवसेनेची दुटप्पी भूमिका  आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आणि परत आले. राज ठाकरे यांची मनसे विझणारा दिवा आहे. आपले राजकारण टिकवण्यासाठी ओवेसी यांच्यावर टीका करतात. केवळ शहरांची नावे बदला, याला ठोका त्याला ठोका अशी मागणी करणारा ठाकरे परिवार मतलबी आहे.

मराठा आरक्षणाचे स्वागत आहे. मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी राज्याची आरक्षण मर्यादा ७० टक्के केली पाहिजे.' (वारीस पठाण)