जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेले पत्र :- अयोध्येतील रामलल्ला येथे प्रभू रामासाठी घर बांधून देण्याची मागणी केली आहे. १९९२ पासून प्रभू राम लल्ला अयोध्या येथील तंबूत राहत आहेत. थंडी, उन्हाळा आणि पाऊस अशा कठीण परिस्थितीत ते राहत असून त्यांच्या डोक्यावर हक्काचे छत्र हवे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. बेघर लोकांना हक्काचे घर देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असून जिल्हा प्रशासनाने प्रभू रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर बांधून द्यावे. (हरी नारायण राजभर )