रंजन गोगोई रिव्यू पिटीशन हिअरिंगला घ्यायला उत्सुक आहेत आणि पिटीशनर्स अजून काय काय समोर येतंय याची वाट पाहातायंत.  मोदींनी समांतर वाटाघाटी करून संरक्षण मंत्रालयाला अडचणीत आणलं होतं याचा कागदोपत्री पुरावा, संबंधितांच्या  ऑफिस नोटस आणि स्वाक्षऱ्यांसहित द हिंदूनी प्रसिद्ध केला आहे.  मोदींनी स्वतःच्या जवाबदारी वर सदर व्यावहार करावा आणि संरक्षण मंत्रालयाला यातून मुक्त करावं अशी मागणी झाली होती,  पर्रीकरांनी त्यावर सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे.  त्यात अनील अंबानी तर आता दिवाळखोर घोषित  होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे ऑफसेट पार्टनरचा प्रचंड झोल होऊन बसला आहे. तस्मात, डील कसं होणार अशी परिस्थिती उद्भवली आहे.  थोडक्यात, मी म्हणालो त्याप्रमाणे मोदींनी घिसाडघाई करून व्यावहार केला असाच अर्थ आहे. 

कॅगच्या अहवालाविषयी काय बोलणार ? तो निव्वळ विनोद आहे. व्यावहाराचे स्वतंत्र ऑडिट करण्याऐवजी युपिएच्या न झालेल्या व्यावहारातील किंमतींना इंफ्लेशन इंडेक्स लावून निर्बुद्ध निष्कर्ष काढला गेला आहे.