एक गोष्ट नंतर स्पष्ट झाली की, जेव्हा हे सगळ घडल तेव्हा दोन मिग२१ विमाने सराव करत होती. म्हणजे पूर्ण तयारीनिशी तयार होऊन हवेत होती. त्यामुळे पाकीस्तानच्या अपेक्षेपेक्षा ती घटनास्थळी लवकर पोहोचली असावीत. पण त्यामुळे एफ१६ ला ब्रिगेडीअर मुख्यालयावर नीट नेम धरायला जमले नाही. व ते क्षेपणास्त्र आवारात पडले. इमारतीचे किंवा नजीकच्या तेलक्षेत्राचे नुकसान झाले नाही.  पण जर नुकसान झाले असते तर मात्र युद्ध घोषीत होऊन, आज युद्धाचा तिसरा दिवस असता.

तसेच पाकिस्तानची त्यावेळेस एकूण २४ विमाने हवेत होती. १९९१ च्या गल्फ युद्धानंतर एवढी विमाने प्रथमच एखादा देश वापरत होता. मग लक्षात येईल की किती मोठ्या तयारीने ते हल्ला करायच्या इराद्याने आले होते. पण निव्वळ योगायोगाने मिग २१ सरावच्या निमित्ताने हवेत असल्याने युद्ध टळले आहे. मला येथे इतकेच सुचवायचे आहे की, पाकिस्तान हा देश साधुसंतांचा देश आहे असे मला बिलकूल वाटत नाही.