विदेशी माध्यमांनी सॅटलाईटवरून घेतलेल्या विडीओजमधे पाकिस्तानचं काहीही नुकसान झालेलं दिसत नाही असं म्हटलं आहे. याचे अनेक तर्कशुद्ध अर्थ आहेत :

१) पुलवामा घातपात हा आपल्या सुरक्षा यंत्रणेच्या गाफिलपणाचं  (अर्थात अजित डोवाल),  मूर्तिमंत उदाहरण आहे. हा मूर्खपणा झाकण्यासाठी मोदींनी त्याचं खापर पाकिस्तानवर फोडलं.

२) जैशे महंमदनी जरी जवाबदारी स्वीकारली तरी  नक्की त्यांनीच घातपात घडवला का ? आणि इतकी सुरक्षा यंत्रणा भेदून कसा घडवला ? याची चवकशी करण्याऐवजी मोदींनी थेट सर्जिकल ऍटॅक केला. 

३) जैशे महंमदची वायरल झालेली ऑडिओ क्लिप हा मोदींच्या वेब सेलचा भंपकपणा  दिसतो.  आपलं किती आणि कसं नुकसान झालं याचं रडगाणं कोणतीही अतिरेकी संघटना गाणार नाही कारण ती स्वतःचीच नामुष्की आहे. अर्थात, मोदींची वेब सेल हे समजण्या इतकी समंजस नाही.

४) पाकिस्तानचं एफ-१६ डाऊन केलं याचा कोणताही पुरावा भारताकडे नाही. मात्र आपल्या दोन्ही विमानांचे भग्नावशेष आणि अभिनंदनची धरपकड या उघड गोष्टी आहेत.

५) केवळ देशाचं नशीब म्हणून अभिनंदनची धरपकड झाली नाही तर मूर्ख सरकार आणि त्याहूनही निर्बुद्ध सपोर्टर्स देशावर युद्ध लादण्याच्या तयारीत होते. इम्रान खाननी सूज्ञपणा दाखवून अभिनंदनला परत केला म्हणून मोदींना झकत थांबावं लागलं. अजूनही ते " भारताकडे राफेल असती तर बरं झालं असतं"  अशीच भाषा करतायंत यावरून काय समजायचं ते समजा.

६) ३०० अतिरेक्यांचे देह कुठे आहेत ? याला सरकार उत्तर देऊ शकत नाही. एकूण प्रकरणाचं गांभिर्य लक्षात घेऊन विरोधक सर्जिकल स्ट्राईकचा रिपोर्ट मागतायंत. मोदींच्या फसवेगिरीची  मात्र हद्द झाली आहे ते म्हणतात " विरोधक वायुसेनेवर अविश्वास दाखवतायंत ! " अविश्वास वायुसेनेवर नाही, तुमच्या गुप्तहेर यंत्रणेवर आणि हेतूवर आहे.  वायुसेनेनी सांगितलेलं काम चोख केलं आहे पण जर अतिरेकी मारलेच गेले नाहीत तर तुमची माहिती चुकीची होती आणि हे कबूल करण्याऐवजी तुम्ही रिपोर्ट मागणाऱ्यांना दोष देतायं इतका भोंगळ युक्तीवाद कुणालाही मान्य होणार नाही.

७) एकूण प्रकरणात देशाची मोठी मानहानी होण्याची चिन्हं आहेत.