संजय क्षीरसागर
शाम भागवत यांना तुमच्या मताचा आदर असेल, मला अजिबात नाही. जमिनी हल्ल्यात पण शत्रूचे मृत देह उचलून आणता येत नाहीत. आणि हवाई हल्ल्यात तर अजिबात नाही. येवढेच नव्हे, तर हवाई हल्ल्यात मृत देह दिसतील याची पण शाश्वती नसते. इमारती वर बाँब टाकल्यावर ती इमारत उध्वस्त होते.  आतले लोक तिथेच मरतात, मातीच्या ढिगाऱ्या खाली. फव्वारा मारल्या वर झुरळे जशी बाहेर येतात, तसे ते मरायला बाहेर येत नाहीत. त्या मुळे मृत देह दिसत पण नाहीत.

"३०० अतिरेक्यांचे मृत देह कुठे आहेत ?" ही मागणी इतकी कमालीची निर्बुद्ध आहे, कि त्याला उत्तर देण्या इतकी पण त्याची लायकी नाही. एका सदस्याला उद्देशून "निर्बुद्ध" हा शब्द वापरल्या बद्दल आयोजकांना जर ही माझी प्रतिक्रिया डिलीट करायची असेल, तर त्यांनी खुश्शाल करावी. बाय द वे  - आपल्या नेव्हीने जर पाकिस्तानचे एकादे जहाज बुडविले तर तुम्ही "बुडलेले जहाज  कुठे आहे ?" विचारणार का? विचारलेत, तरी मला आश्चर्य वाटणार नाही.