इंग्रजीत एक शब्द आहे "estimate". अर्थ माहीत नसेल तर शब्द कोश बघा. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत, त्या एस्टिमेट कराव्या लागतात.  जसे देशाचे जीडीपी, गरीबी रेषेच्या खालील लोकांची संख्या,  भारतात कॅन्सरचे रुग्ण, या वर्षी शेंगदाण्याचे उत्पादन, हिमालयात या वर्षी किती हिमपात झाला, कोणत्याही खनिजाचे साठे, कॉर्बेट पार्क मध्ये एकूण अस्वलांची संख्या, . . . . . यातील काहीही मोजता येत नाही. पण एस्टिमेट करता येते. भारता कडे ३१५.१४  बिलियन मेट्रिक टन कोळसा आहे असे  कोणी म्हणाल्यास "दाखव कुठे आहे, प्रत्येक टन मोजून दाखव"  असे कोणीही म्हणत नाही. कपिल सिब्बल सुद्धा नाही.

सरकारने जेव्हां ३०० अतिरेकी मारले गेले असे सांगितले, ते काही  १०० रुपायांच्या स्टॅंप पेपर वर लिहून दिलेले ऍफिडेविट नव्हते, कि बरोबर ३००, एक कमी नाही किंवा जास्त नाही.  हे एस्टिमेट कसे केले असा प्रश्न जर कोणी विचारला असता, तर त्यावर चर्चा होऊ शकली असती. कपिल सिब्बल किम्वा दिग्विजय सिंग यांनी तो विचारला नाही कारण त्यांना उत्तर माहीत होते. ते फक्त राजकीय लाभा करता असले प्रश्न विचारीत होते. तुम्ही तो का विचारला नाही याचे उत्तर तुम्ही द्यायचे आहे.
(न दिल्यास आम्ही एस्टिमेट करूच  )