१) सर्जिकल स्ट्राईक हा नेमक्या ठिकाणावर केलेला हल्ला असतो. गुन्हा घडवल्यावर जिथून गुन्ह्याचं नियोजन केलं तिथून  गुन्हेगार फरार होतो. त्यामुळे घातपात घडल्याघडल्या  तत्परतेनं कार्यवाही केल्यास परिणाम साधण्याची शक्यता सर्वाधिक असते. मोदींना दिवसातून चार वेळा कपडे बदलणं आणि निवडणूक प्रचारातून वेळ काढणं १२ दिवस शक्य झालं नाही. त्यात मोदींना प्रचंड इंफिरिऑरिटी काँप्लेक्स असल्यानं ते प्रत्येक वेळी लोकांचा  कल काय आहे ते सभातून भन्नाट वक्तव्य करुन आजमावून बघतात आणि मग निर्णय घेतात. या सगळ्या प्रकारात जैशनी आपला तळ हलवला त्यामुळे गुप्तहेर यंत्रणेकडची माहिती निकामी ठरली, हे सर्जिकल स्ट्राईकचा फज्जा उडण्यामागचं खरं कारण आहे. 

२)  पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची हीच तऱ्हा झाली होती. मोदींनी असे काही ढोल बडवले आणि सांगितलं की आम्ही दहशतवाद्यांना जबरदस्त धडा शिकवला की आता पुन्हा ते अशी हिंमत करणार नाहीत. (पुन्हा डांगोरा पिटायला उरीवर चित्रपट काढून ठेवला !  ) पण काय झालंं बोंबलायला ? काश्मिरमध्ये दहशतवादात जसाच्या तसा चालू राहिला. आणि पुलवामा घातपात ही देशाच्या दृष्टीनं  अत्यंत दुःखद घटना आहे पण तिचा दुसरा अर्थ काय निघतो ? मोदींच्या पहिल्या सर्जिकल ऍटॅकचा शून्य उपयोग झाला  आहे आणि त्यांच्या नौटंकी वल्गनांना अतिरेकी अजिबात भीक घालत नाहीत.

३) तुम्ही म्हणतायं सरकारनी किती अतिरेकी मेले याचं एस्टीमेट दिलं !  काय विनोदी प्रकार आहे  हा !  थोडक्यात, तुम्हाला मराठी शब्दकोष पाहाण्याची गरज आहे. एस्टीमेटचा  मराठी अर्थ अंदाज आहे आणि अंदाजपंचे दाहोदरसे अशी म्हण सुद्धा आहे !  अंदाज काय काहीही ठोकता येतो. न मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकच्या परिणामाचा काही ठोस पुरावा, ना तुमच्या अंदाजपंचे तर्कमूढ विधानाला काही अर्थ. थोडक्यात, हा सर्जिकल स्ट्राईक पहिल्यासारखाच फेल गेला आहे.