मोदींचे बथ्थड प्रवक्ते उर्फ संबित पात्रा हे सुरुवातीला ३०० अतिरेकी मेले म्हणत होते, मग कोण मोजायला जाणार आहे ( असा तुमच्यासारखाच तर्कमूढ विचार करुन), ४०० अतिरेकी मेले म्हणायला लागले . मोदींना कशाचीच काही पडलेली नाही, त्यांना फक्त पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. पण प्रकरण अंगलट येतंय म्हटल्यावर त्यांनी (नेहेमी प्रमाणे) मुळ मुद्याला बगल दिली आणि म्हणायला लागले, किती अतिरेकी मेले हे विचारणं म्हणजे वायुदलाच्या कामगिरीवर अविश्वास दाखवणं आहे. त्यांचे दुसरे भाट पियुष गोयल, इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव मध्ये तर या थराला गेले की ते राहूल कंवलला (काँपेरर) म्हणाले की तू असा प्रश्न विचारतोयंस म्हणजे तू पाकिस्तानच्या बाजूनी आहेस ! राहूल कंवलनी त्यांना जाम चोपला, तो म्हणाला, "माझे वडील आर्मीत होते आणि माझ्याच काय इथल्या कुणाचीही देशभक्ती तुमच्यापेक्षा कणभरही कमी नाही, पण आपल्या कामगिरीचे पुरावे आपल्याला जगासमोर ठेवायला हवेत. " यावर सर्व ऑडियन्सनी जोरदार टाळ्या वाजवल्या आणि पियुष गोयल तोंडात मारल्यासारखे गप्प झाले !