१. मुळ मुद्दा सर्जिकल ट्राईक २  फेल गेला हा आहे आणि मोदी केवळ सत्तापिपासू  असल्यामुळे त्यांना त्याची काहीही पडलेली नाही हा उपमुद्दा आहे. तुम्ही पंतप्रधानपदाची मनिषा कुणाला आहे याची व्यर्थ वाजंत्री वाजवली आहे. 

२. मोदी हे पंतप्रधान काय अंगणवाडी पदासाठी सुद्धा लायक नाहीत कारण ते बेजवाबदार आहेत्त. सर्जिकल स्ट्राईक १ सुद्धा फेल गेला याचं पुलवामा घातपात हे उत्तम उदाहरण आहे. थोडक्यात मोदींचे सर्वच्या सर्व निर्णय > नोटाबंदी, बुलेट ट्रेन आणि जिएसटी फेल गेले आहेत. नोटाबंदीचा शून्य परिणाम झाला आणि त्याचा सामान्य नागरिकांना अतोनात त्रास झाला पण दोन वर्ष झाली तरी "मला ३० डिसेंबर (२०१६) नंतर कोणत्याही चौकात जवाबदार धरा"  म्हणणारे हे बेजवाबदार गृहस्थ आज त्याबद्दल ब्र ही काढत नाहीत. बुलेट ट्रेन पायी देश १.१० लाख कोटींच्या कर्जात नाहक बुडाला आहे पण मूर्खासारखं काही तरी दिव्य करायच्या भानगडीत तो निर्णय देशावर नाहक लादला गेला आहे. जिएसटीमुळे सगळे व्यापारी हैराण आहेत आणि आता देशाच्या अंतापर्यंत हा निर्बुद्ध निर्णय इंटर्नेट, वीज आणि दरमहा १९ लाख मनुष्यांचे कामाचे तास वाया घालवणार आहे.

३. कुणीही काही प्रश्न विचारला की तू पाकिस्तानात जा अशी अत्यंत दळभद्री शेरेबाजी मोदींचे अंधभक्त कायम करत आले आहेत त्यामुळे देशात निष्कारण फूट पडली आहे आणि मोदी भक्त तो देशप्रेमी आणि बाकीचे सगळे देशद्रोही असा अत्यंत लांछनास्पद प्रकार हे सरकार आल्यापासून सुरू झाला आहे. थोडक्यात, मोदींसारखा अत्यंत बेजवाबदार आणि सत्तालोलुप माणूस राजकारणातून कायमचा हद्दपार झाल्याशिवाय देशाचं भलं होणं अशक्य आहे.