अगदी अगदी. आदरणीय राहुल, शरद पवार, ममता, लालू, मायावती, चंद्राबाबू यांच्यासारखी स्वच्छ चारित्र्याची, सत्तेतून लाभाची अपेक्षा न करणारी आणि अत्यंत जबाबदारीने वागणारी मंडळी आल्याशिवाय देशाचे भले होणार नाही.

विनायक, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा विसरलात. स्वच्छ चारित्र्य, सत्तेतून लाभाची अपेक्षा न करणे, अत्यंत जबाबदारीने वागणे, याही पेक्षा महत्वाचे म्हणजे -  परदेशात घुसून लष्करी कर्यवाई केल्यास शत्रूचे नेमके काय नुकसान झाले त्याचे पुरावे सोबत आणणे - जसे मृत देह; जे लोक मारले गेले ते अतिरेकीच होते, साधू-संत नव्हते, याचे पुरावे; इमारती पाडल्या  असल्यास त्यांचे भग्नावशेष; विमाने पाडली असल्यास, किंवा शत्रूच्या विमान तळावरच उध्वस्त केली असल्यास, उध्वस्त विमाने; नौसेने ने नौका बुडविली असल्यास बुडलेली नौका, इत्यादी सर्व "अस्थी" सोबत घेऊन येणे.  तसेच, एकदा का  परदेशात घुसून लष्करी कर्यवाई केली, कि परत यावत्चंद्र दिवाकरौ कुठेही अतिरेकी हल्ला होता कामा नये.

मला वाटते कि या  (वि)संवादाचे शीर्षक "अभिनंदन , मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे" हे बदलून "संजर क्षीरसागर, आम्ही सर्व तुमच्या पुढे नतमस्त्क आहोत" असे करावे.

ता. क. माझ्या यादीत मी लालू प्रसाद यांचे नांव विसरलो होतो, ते आठवण करून दिल्या बद्दल आभार.