मोदी हे फेल गेलेले पंतप्रधान आहेत

नशीब आमचे कि तुम्ही येवढे तरी मान्य करता कि  मोदी पंतप्रधान आहेत. कारण, ते पंतप्रधान आहेत याचा पुरावा तुम्ही मागितल्यास आम्ही तो कुठून देणार? असो. पास झालेले पंतप्रधान कोण आहेत ? देवेगौडा? मनमोहन सिंग? राहुल गांधी तर नक्कीच नाही, कारण ते ना काही पास आहेत, ना काही फेल आहेत.  ते दहावी फेल आहेत असे ऐकिले आहे, पण आमच्या कडे  तसा कोणताही पुरावा नाही. बाकी, ते पास अथवा फेल पंतप्रधान काय, केंद्रीय मंत्री, केंद्रीय राज्य मंत्री, राज्यात मंत्री, . . . . . उप-सरपंच, अगदी नगरसेवक सुद्धा नाहीत. कोणतेही पद स्वीकारलेच नाही, कोणतीही जबाबदारी अंगावर घेतलीच नाही, परिक्षेला बसलेच नाही, कि फेल होण्याचा प्रश्नच येत नाही. नेहेरू-गांधी घराण्याच्या सध्याच्या पिढीची ही आयडिया मात्र एकदम भारी आहे. स्वतः कडे कोणतेही पद घ्यायचे नाही. पदांवर कठपुतळ्या बसवायच्या. त्यांचे दोरे आपल्या हातात ठेवायचे. जे काही बरे होईल  त्याचे श्रेय आपल्या कडे घ्यायचे, व जे काही चुकेल त्याचे अपश्रेय पदां वरच्या बाहुल्यां वर ढकलायचे. अश्या प्रकारे जबाबदारी न घेता अमर्याद सत्ता भोगायची.