'धमाल' या शब्दाशी असहमत होऊन सुरुवात करतो. 'न्यूटन' इज एनिथिंग बट धमाल. 'न्यूटन' हा सिनेमा अस्वस्थ करणारी कडू गोळी आहे. अर्थात ज्यांना डोक्याला त्रास नको आहे त्यांनी लेखकाने म्हटल्याप्रमाणे या सिनेमाच्या नादाला लागू नये. पण अद्याप असे सिनेमे निघतात म्हणजे आशेला जागा आहे असे म्हणायला हरकत नाही. राजकुमार राव, पंकज त्रिपाठी थोर. बाकी मंडळीही उत्तम. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापेक्षा अधिक सुसंगत काही बघायला मिळेल असे वाटत नाही.