मोदींनी हा चित्रपट रेटला होता !
अर्थात, विरोधकांनी मोदींचा डाव वेळीच ओळखून, निवडणूक आयोगाकडून त्याच्या निवडणूकपूर्व प्रकाशनावर बंदी आणली.
१) गुजराथ हत्याकांडात जस्टीस खरे यांनी भर सुप्रीम कोर्टात मोदींना " मॉडर्न डे नेरो " म्हटलं होतं. सबळ पुरावे नष्ट केल्यानं आणि अत्यंत महत्त्वाची कागदपत्र, सरकारनी सरळ आरोपीच्या वकीलांना दिल्यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असा प्रकार आपण आयुष्यात कधीही बघितला नव्हता असं ते म्हणाले होते.
२) टाईम्सनी " इंडीयाज ग्रेट डिवायडर इन चिफ" ही मोदींना दिलेली सर्वोच्च पदवी हे त्यांचं गेल्या पाच वर्षातलं एकमेव कर्तृत्व आहे आणि ते त्यांच्या गुजराथ हत्याकांडापासून दिसणाऱ्या मनोवृत्तीला पुनश्च अधोरेखित करतं.
३) त्यांच्या " एक मिनीटके फैसलेनंच " नोटाबंदीसारखा निर्बुद्ध निर्णय झाला. आणि शेवटी तर त्यांनी " ढगांमुळे आपली विमानं पाकिस्तानच्या रडारवर दिसणार नाहीत !" असा प्रचंड विद्वत्तापूर्ण युक्तीवाद करून सर्जिकल स्ट्राईकचा पूर्णपणे फज्जा उडवला ! पण जनता इतकी अनभिज्ञ आहे की अशा फसलेल्या निर्णयावर सुद्धा त्यांना बहुमतानं निवडून दिलं गेलं !
असो, जेतेच इतिहास लिहीतात त्यामुळे आता मोदी हे आमरण देशाचे पंतप्रधान राहाणार अशी लक्षणं आहेत !