संजयजी,
निवडणूक निकालावर तुमच्या विश्लेषणाची आतुरतेने वाट पहात होतो. रिकामे धरण मॉनसूनची पाहत नसेल येवढ्या आतुरतेने. या वेळी ईवीएम मशीन वर आरोप हरलेल्यांनी पण केला नाही, तेव्हां तुम्ही कसा करणार ? दहा-वीस धावांनी मॅच हरली, तर त्याचे खापर खेळपट्टी किंवा पंचांच्या एकाद्या निर्णयावर वर फोडता येते. पण इनिंग्स डिफीट झाल्यास तसे करता येत नही. "प्रतिस्पर्धी टीम आपल्या पेक्षा जास्त चांगली खेळली" हे आपण मान्य केले नाही, तरी मॅच बघणाऱ्यांना ते कळत असते.
असो. आपले काहीतरी गंभीर चुकले आहे, हे काँग्रेस पक्षाच्या लक्षात आलेले आहे. म्हणून काल त्यांनी निर्णय घेतला कि एक महिना ते टीव्ही चर्चे पासून दूर राहतील. राजकीय पक्ष इतर कशालाही दोष देवोत, पण जनतेला दोष कधीच देत नाहीत. कारण त्यांना माहीत असते कि आता सुशिक्षित मतदारांची संख्या खूपच जास्त आहे, व आता जनता मूर्ख नाही. जसे, गोध्रात जे काही घडले, व त्यावर जस्टिस खरे यांनी जे काही म्हंटले, ते सर्व माहीत असून सुद्धा अनेक असे मतदार संघ, जिथे मुस्लिम मते निर्णायक होती, अश्या मतदार संघातून पण भाजपा जिंकली. याचा अन्वयार्थ तुम्ही काय लावता?
साधी गोष्ट अशी आहे कि ही निवडणूक अमेरिकन प्रेसिडेन्शियल निवडणूकी प्रमाणे मोदी विरुद्ध राहुल, अशी झाली. ती तशी राहुल यांनीच केली. आता मोदींचे प्रतिस्पर्धी कोण होते ? तर अख्ख्या आयुष्यात मंत्रीपदाची जबाबदारी तर दूरच, साधे नगरसेवकाची जबाबदारी पण न पेललेले. भविष्यात आपण पंतप्रधान पदा करता बाजी लावणार आहोत. तेव्हां शासन कसे चालते याचा अनुभव यावा या करता, केन्द्रात तब्बल दहा वर्षे त्यांची सत्ता असताना एकाद्या मंत्रीपदाची जबाबदारी ते स्वीकारू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांची इभ्रत आड आली - ज्याचा लवकरच राज्याभिषेक व्हायचा आहे त्या राजपुत्राने मंत्रीपद सांभाळावे? छे, भलतेच काय ? त्यांच्या चेल्या-चमच्यांनी पण त्यांना तसा सल्ला दिला नाही, कारण त्यांना ठाउक होते कि झाकली मूठ झाकलीच राहिलेली बरी. जनतेला हे कळत नाही?
आता तुमच्या कडे जनता अनभिज्ञ (म्हणजे मूर्ख) आहे असे म्हणण्या व्यतिरिक्त इतर काही पर्यायच उरलेला नाही. असो. मागे तुम्ही भविष्य्वाणी केली होती, कि सर्वोच्च न्यायालय एक-दोन महिन्यतच मोदींना पायउतार करेल, जेल मध्ये पण पाठवेल, त्याचे काय झाले? मोदींची जेल मध्ये जाण्याची नवीन तारीख काय आहे? का, जनते प्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण अनभिज्ञच आहेत?