मी तसेच असंख्य पुरोगामी विचारवंत मोदीविरोधात अनेक गोष्टी सातत्याने सांगत आहोत.
१. नोटबंदी फेल गेली.
२. जी. एस. टी. फेल गेला.
३. राफेलमध्ये मोदींनी प्रचंड भ्रष्टाचार केला.
४. देशात अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने आली, अंधारयुग सुरू झाले. हुकुमशाही सुरू झाली.
५. सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत/ झालेच असले तर अतिरेकी मेले नाहीत/मोदींच्या आधीही काँग्रेस सरकारनेही चार/सहा/अकरा सर्जिकल स्ट्राइक्स केले होते पण त्याचे भांडवल न करण्याची उदात्त परंपरा राहिली आहे.
६. सर्वोच्च न्यायायलाही मोदींनी मॅनेज कले आहे.
पण माझे मौलिक विचार लोकांपर्यंत नेण्यात माध्यमे अपयशी ठरली.
(खात्री नसेल तर गुजराथच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर हा विजय माझे विचार लोकांपर्यंत पोचनण्यात अपयश आल्याने भाजप जिंकली होती असा लेख मनोगतावर लिहिला होता. )
मोदींनी मात्र गोबेल्सला लाजवेल असा खोटा प्रचार घराघरापर्यंत पोचवला.
तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता पण सर्वांना सर्व काळ बनवू शकत नाही. आता काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत नाहेत. त्यात पराभव झाल्यास मोदींनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. अन्यथा जनता त्यांना २०२४ मध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.