मोदींना धडा तर मतदारांनी याच वर्षी शिकविला आहे. असे म्हणतात कि २०१४ सालच्या निवडणूकीच्या वेळी मोदींनी घोषणा केली होती कि परदेशातील काळा पैसा परत आणून प्रत्येक नागरिकाच्या बॅन्क खात्यात १५ लख रु. जमा केले जातील. पण तसे झाले नाही. या वर्षी मोदींना परत भरघोस मते देऊन लोकांनी इशारा दिला आहे कि "मोदीजी, तो पर्यंत तुम्ही तुमचे वचन पूर्ण करीत नाही, आमच्या प्रत्येकाच्या खात्यात १५ लारु जमा करीत नाही, तो पर्यंत आम्ही तुम्हाला प्रधान मंत्री पद सोडून जाउ देणार नाही". 

जनता मोदींवर आणखीन एका कारणा करता रागवली आहे. एक तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू असे म्हंटले होते, ते केले नाही. त्या उप्पर, राहुल याने वचन दिले होते कि प्रत्येक गरिबाला दर वर्षी ७२,००० रु. मिळतील, पण राहुलला हरवून ते ७२,००० रु पण मिळू दिले नाहीत. म्हणजे १५ लख तर गेलेच, पण ७२,००० पण गेले.  भाजपा जिंकण्याचे खरे कारण असे आहे कि जनतेने निष्पक्ष पणे मतदान केलेच नाही. दुष्ट जनतेने भाजपा बरोबर हात मिळवून निष्पाप काँग्रेसला हरविण्याचे कुटिल कारस्थान रचले, त्या प्रमाणे मतदान केले.