भारतीय मानसिकतेचं प्रातिनिधिक उदाहरण आहे !
१. " जनता मोदींवर आणखीन एका कारणा करता रागवली आहे. एक तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करू असे म्हंटले होते, ते केले नाही"
जनता रागावली नाही, विसरली आहे ! इतक्या बोगस व्यक्तीला पुन्हा निवडून देतांना लोक म्हणाले " नोकऱ्या नसल्या तरी चालेल, पेट्रोल १०० रुपये होऊं दे, महागाई कितीही वाढू दे, पण पाकिस्तानला धडा शिकवणारा पंतप्रधान हवा ! "
आणि आपले हे दिव्य पंतप्रधान, ढगाळ हवामानात अचूक लक्षभेद होऊ शकणार नाही हा लष्करी तज्ञांचा सल्ला झुगारुन, सर्जीकल स्ट्राईक करायला भाग पाडतात. मग त्याने शत्रूच्या केलेल्या नुकसानाचे पुरावे देता येत नाहीत. संपूर्ण साहस व्यर्थ ठरतं, अतोनात आर्थिक अपव्यय होतो... तरीही निवडणूक जिंकली जाते ! कारण काय तर तुमच्यासारख्या विचारसरणीचे लोक !
२. राहुल गांधींची योजना, मोदींसारखी १५ लाख प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याची नव्हती. वर्षाला ७२,००० रुपये दारिद्र्यरेषेखालच्या लोकांना मिळून, जगायची संधी देण्यासाठी होती !
पुन्हा तुमचा अज्ञानमूलक प्रतिसाद वाचा. तुम्हाला वाटतंय तुमचे ७२,००० बुडाले ! तुम्ही दारिद्र्यरेषे खाली आहात का ?