आजच्या म. टा. त हे वाचले.

मराठी भाषेची सक्ती करा

.......तर सरकारने किमान दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करावा, ' अशी जोरदार व एकमुखी मागणी लेखक, कवी, शिक्षक, प्रकाशक यांनी मंगळवारी केली. क्वचितच एकत्र येणाऱ्या मराठी सारस्वतांची मराठीच्या मुद्द्यावर एकजूट झाल्याचे दिसून आले.

मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करावा व राज्यात मराठी भाषा प्राधिकरण स्थापन करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर १८ जूनला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.  ....