... काउण्टरच्या पलीकडे बँक कर्मचारी जलद गतीने एकेकाची काम उरकत जातो. काम अर्धवट सोडून मध्येच शेजार्याशी वायफळ गप्पा मारीत नाही. वगैरे....

अमेरिकेत सर्वसामान्य लोकांशी व्यवहार करणाऱ्या एका सेवादाता कंपनीच्या कार्यालयात मी अगदी प्रथम गेलो होतो तेव्हा तेथल्या प्रमुख कार्यालय प्रबंधकाला लेखनिकाच्या टेबलाजवळची कचऱ्याची टोपली उचलून नेताना आणि रिकामी आणून ठेवताना पाहिले तेव्हा मी चाट झालो होतो.

मात्र नंतर असे सगळीकडेच दिसते असे दिसल्यावर असे आश्चर्य वाटत नाहीसे झाले आणि सगळीकडे असेच असावे (म्हणजे 'असायला हवे' आणि 'असणार' अशा दोन्ही अर्थाने) असे मनात येऊ लागले.