आपल्या हयातीत, शून्य कामगिरी असतांना, स्वतःभोवती आरती ओवाळण्याचा लज्जास्पद प्रकार  आणि जाहिरातबाजी आहे.

शून्य कामगिरी असतानाही जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने कसे काय निवडून दिले?

एखाद्या व्यक्तीनं उत्तम कामगिरी केली तर इतिहास आणि जनता त्याची योग्य दखल घेताताच.

या विधानाचा व्यत्यास खरा समजायचा का? म्हणजे असे की जनतेने (इतिहासाचे तूर्तास बाजूला ठेवू) एखाद्याची योग्य दखल घेतली, जसे की त्या व्यक्तीला परत प्रचंड बहुमताने निवडून दिले, तर  ते त्या व्यक्तीने केलेल्या उत्तम कामगिरीचे फळ समजायचे का? मनमोहन सिंग यांची कामगिरी उत्तम नव्हती का? राहुल, सोनिया, मनमोहन (झालेच तर शरद पवार, लालू, ममता) यांच्याबद्दल इतिहास, जनता वगैरेंचे काय मत समजायचे? स्मृती इराणींचे काय समजायचे?