श्री. नरसिंह राव आणि श्री. अटलबिहारी वाजपेयी - पुन्हा निवडून आले नाहीत, बहुतेक दोघांनाही फालतू चित्रपट काढणे जमले नसावे. 
यात गंमत अशी आहे, कि मोदी यांच्या वर चित्रपट - तो फालतू आहे असे आपण क्षण भर मान्य करू - निवडणुका पूर्ण होई पर्यंत प्रदर्शित झालाच नाही. तरी पण ते जिंकले. म्हणजे, चित्रपट न बघताच, केवळ त्यांच्या वर एक चित्रपट बनविला आहे "असे समजते", येवढ्याच कारणास्तव लोकांनी मोदींना मते दिली. याचा अर्थ असा होतो कि, लोक जर चित्रपट न बघताच मते देत असतील,  तर वास्तविक कोणतही चित्रपट न बनविता, केवळएक चित्रपट बनविला आहे अशी वावडी जरी उठविली, तरी निवडणूक जिंकता येईल. (एवीतेवी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायचीच आहे ना, मग चित्रपट न बनविताच तो बनविला आहे, ही पण आणखीन एक डोळ्यात धूळफेक) ही ट्रिक श्री. नरसिंह राव आणि श्री. अटलबिहारी वाजपेयी यांना माहित नव्हती हे त्यांच्या पक्षांचे दुर्दैव. 

जाता जाता - राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाहीत याचे कारण कळत नाही. उत्तम कामगिरीच्या जोरावर ते निवडून येऊ शकत नव्हते, हे मान्य. कारण कोणतीही कामगिरी करवयास (उत्तम किंवा फालतू)  आधी एकादे पद व जबाबदारी स्वीकारावी लगते. मनमोहन सिंग दहा वर्षे प्रधान मंत्री असताना राहुल गांधी यांना एकादे मंत्री पद सहज स्वीकरता आले असते, व आपले कर्तुत्व सिद्ध करता आले असते. त्याही पुढे, मनमोहन सिंग यांच्या पहिल्या पाच वर्षात एकादे मंत्री पद स्वीकारून,आपले कर्तुत्व सिद्ध करून, पुढच्या पाच वर्षात पंतप्रधान पद पण मिळवता आले असते, व आपले कर्तुत्व  दुपटीने सिद्ध करता आले असते. पण मंत्री पद तर सोडाच, राहुल गांधी यांनी आज पर्यंत साधे नगर सेवकाचे पद सुद्धा स्वीकारून आपले कर्तुत्व सिद्ध केलेले नाही. त्या मुळे निवडून येण्या करता "उत्तम कामगिरी" हा रस्ता बंद होता. (एकच पद त्यांनी स्वीकरले, ते म्हणजे काँग्रेस पक्षाध्यक्ष. व त्यात ते अपयशी झाले अशी कबुली तर खुद्द त्यांनीच दिली आहे)

पण फालतू सिनेमाचा रस्ता खुला होता ना. यू-ट्यूब वर त्यांचे इतके विडियो आहेत (ते फालतू आहेत का कसे, हे ज्याचे त्याने ठरवावे) कि ते जोडल्यास तीन तासाचा एक सिनेमा सहज होईल. आणि मोदीच्या सिनेमा सारखे हे विडीयो निवडणुका पूर्ण होईपर्यंत बंद डब्यात नव्हते. कोणत्याही सिनेमा गृहात न जाता घर बसल्या बघता येत होते. आणि जनतेने ते बघितले सुद्धा. तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाहीत, हे अजब आहे.