तुमचा तपशीलवार खुलासा मला पटला किंवा नाही हा मुद्दा आता गैरलागू आहे, कारण निवडणूक झाली आणि ती मोदींनी प्रचंड बहुमताने जिंकली. तुम्ही आणि मी तात्त्विक वाद करून काहीही निष्पन्न होणार नाही.

नोटबंदीबद्दल  कितपत यशस्वी वगैरे जरी वादाचे मुद्दा असला (मोदीविरोधकांनी तो केला असला) तरी त्यामागचा  हेतू प्रामाणिक होता हे लोकांना पटवण्यात मोदी यशस्वी झाले.
जी. एस. टी. बद्दल व्यापारी लोकांमध्ये समाधान आहे कारण असंख्य करांऐवजी सुटसुटीत करपद्धती आली. 
या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अगदी खेड्यात राहणाऱ्या माणसांच्या घरी शौचालये आली. घरे आली. सर्वांना मिळाली नसतीलही. पण ओळखीतल्या कोणाला आज मिळाले तसे उद्या आपल्यालाही मिळेल अशी आशा लोकांमध्ये उत्पन्न झाली. इस्पितळांमध्ये आजारी लोकांना मोफत उपचार मिळू लागले. घरोघरी वीज आणि स्वैपाकाचा गॅस आला.

त्यामुळे हे सरकार
१. स्वच्छ आहे,
२. आपल्यासाठी निस्वार्थपणे काम करते आहे. ३. पाकिस्तानसारख्या उपद्रवी देशाला त्यांना समजेल अश्या भाषेत उत्तर देते आहे., यांना पुन्हा एकदा संधी द्यायला हरकत नाही 
अश्या भावनेतून लोकांनी मोदींना निवडून दिले.

अगदी लोकसभेच्या आधी राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी राजस्थानात "मोदी तुझ से बैर नहीं रानि तेरी खैर नहीं" अशी घोषणा होती, अर्थात माध्यमे आणि मोदीद्वेष्ट्यांनी राज्यात मोदीविरोधी लाट आली असा अर्थ लावला.

त्यामुळे केवळ फालतू सिनेमे काढले, जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली , मोदींशिवाय कोणी नाही हे पटवले म्हणून जिंकले हे म्हणणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करणे आहे.