कारण ते आणि शहा अशीच जुमलेबाजी करत लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणार यात आता काहीही शंका नाही.

१. नोटाबंदी पूर्णपणे फसलेला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे नेणारा निर्णय होता यात वाद नाही.

२. जिएसटीमुळे स्वस्ताई होईल हा खरा मुद्दा आणि जेटलींचा दावा होता > हे तुमच्यासारखी जनता विसरुनच गेली !

३. बुलेट ट्रेन, सरदार पटेल अवाढव्य पुतळा,  ऐतखाऊपणे केलेल्या निरर्थक परदेश वाऱ्या (शून्य परकीय गुंतवणूक) , पुरावे न देता येणारे निरुपयोगी सर्जिकल स्ट्राईक्स > या वेगवेगळ्या मूर्खपणाबद्दल तुम्ही  मोदी आणि शहांसारखेच मौन धरले आहे !

४. उज्वला गॅस योजनेत लोकांनी दुसरा रिफिल सुद्धा घेतला नाही (कारण किंमत परवडत नाही) . संविद पात्राच्या प्रचार मोहिमेत तो ज्या घरी जेवतोयं तिथे चुलीवर स्वयंपाक चालू आहे असं दृष्य दिसत होतं !

थोडक्यात काय ? पूर्वी गरीब जनतेला मूर्ख बनवून सरकार बनवलं जायचं, मोदींनी  सुशिक्षितांना मूर्ख बनवून सरकार बनवलं आहे !