पूर्वी गरीब जनतेला मूर्ख बनवून सरकार बनवलं जायचं, मोदींनी  सुशिक्षितांना मूर्ख बनवून सरकार बनवलं आहे

थोडक्यात काय, तर ज्याने भाजपाला वोट दिले, जो मोदीच्या समर्थनात काहीही लिहील, ते सर्व मूर्ख. अश्या भूमिकेचा प्रतिवाद करणे अशक्य आहे. व त्याची गरज पण नाही.  अमेरिकेत एक सोसायटी आहे. त्याचे नाव "फ्लॅट अर्थ सोसायटी". म्हणजे, "चपटी पृथ्वी सोसायटी". त्यांची वेबईट  theflatearthsociety.org बघावी. त्यांचे असे म्हणणे आहे कि पृथ्वी ही चेंडू प्रमाणे गोल नसून नाण्या सारखी चपटी आहे. हे असे आहे हे त्यांनी अधीच ठरविले आहे. व याचा कोणीही काहीही प्रतिवाद केला तर तो अमान्य करण्याचा साधा उपाय त्यांच्या कडे आहे. जसे, नासा ने अंतराळातून  पृथ्वीचे सर्व बाजूनी घेतलेले फोटो दाखविले. प्रत्येक फोटोत पृथ्वी वर्तुळाकारच दिसते. आता जर एकादी वस्तू कोणत्याही अँगल ने वर्तुळाकारच दिसत असेल, तर ती चेंडू प्रमाणे गोल आहे, हे उघड आहे. या वर त्यांचे उत्तर असे, कि नासा या संसथेने लोकांना मूर्ख बनविण्या करता हे बोगस फोटो बनविले आहेत. 

काही काळ शास्त्रज्ञांनी त्यांना समजावण्याचा, वाद घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना "समजत नाही" असे नसून समजून घेण्याची इच्छाच नाही, हे लक्षात आल्या वर तो नाद सोडून दिला. तसेच तुमचे. त्यापेक्षा "मी मूर्ख आहे" हे मान्य करून जे तुम्हाला समजण्याची इच्छाच नाही ते समजावण्याच्या प्रयत्नात जात असलेला वेळ इतरत्र वापरणे चांगले.