१. १३० कोटी लोकांच्या देशात ही प्रसंगाची तीव्रता लक्षात यावी म्हणून केलेली वाक्य रचना आहे. तुमचा तर्कहीन प्रतिसाद त्यात रांगती बाळेसुद्ध धरतो म्हणजे कमाल आहे . माझ्या म्हणण्याचा थोडक्यात अर्थ ( तुम्हाला समजेल असा) की "मोदी सोडता या देशात कुणीही व्यक्ती पंतप्रधान व्हायला लायक नाही" या मूढ तर्कापुढे जनतेनं मान तुकवावी हे आश्चर्य आहे !
२. भ्रष्टाचार संपूर्ण संपवेन > " न खाऊंगा न खाने दूंगा " ही तुमच्याच लाडक्या पंतप्रधानांची भिष्मप्रतिज्ञा आहे ! विसरभोळी जनता हे मोदींचं एकमेव ऍसेट आहे. अर्थात, ते स्वतःच राफेलमधे गोत्यात येण्याची शक्यता आहे तो भाग वेगळाच !
३. " बुलेट ट्रेनमधे कुणीही बसणार नाही पण जगायला सांगायला की आमच्याकडे सुद्धा बुलेट ट्रेन आहे, आपल्याला हा प्रकल्प आणायला हवा" अशी तुमच्या लाडक्या पंतप्रधानांची मुक्ताफळं आहेत ! ते देशासाठी इंफ्रास्ट्रक्चर निर्माण करणं नाही. तो त्यांचा व्यक्तिगत न्यूनगंड दूर करण्यासाठी देशावर नाहक लादलेला प्रकल्प आहे.
तुम्ही जरा वाचन वाढवावे आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा काही उपाय करावा.