कोण म्हणाल कि  मोदी सोडता या देशात कुणीही व्यक्ती पंतप्रधान व्हायला  लायक नाही ? अनेक जण लायक असतील. (इतर कोणी नसले तरी तुम्ही आहात कि :-).  पण ते जे कोणी लायक असतील, त्यांनी निवडाणूकच लढविली नाही तर त्याला जनता काय करणार ? त्याला/ तिला फरफटत ओढूण आणून त्याच्या/ तिच्या डोक्याला पिस्तूल रोखून उमेदवारीचा अर्ज भरवून घेणार ? जनतेने १३० कोटीतून मोदींना निवडून दिल हा तुमचा भ्रम आहे. जनतेने जे दोनच उमेदवार होते (मोदी व राहुल) त्य अदोघां पैकी मोदींना निवडून दिल. 

" न  खाऊंगा न खाने दूंगा "  ही तुमच्याच लाडक्या पंतप्रधानांची भिष्मप्रतिज्ञा आहे ! नक्कीच आहे. त्यातला पूर्वार्ध  "न  खाऊंगा" हा त्यांनी अमलात आणलेला आहेच. आणि आत्ता नव्हे, तर त्या अधी पंधरा वर्षे गुजरातेत मुख्य मंत्री असताना पण. राहिला उत्तरार्ध - "न खाने दूंगा". त्या दिशेने उत्तम प्रगती सुरू आहे. पाच वर्षे केन्द्रात सरकार  आणि एकही स्कॅम नाही. राफेलमधे कोणीही गोत्यात येणार नाही, निश्चिंत राहा, कारण तिथे काहीही स्कॅम नाहीच. निवडणूक संपल्या नंतर काँग्रेस ने पण ते तुणतुण टाकून दिल आहे. तरीही तुम्हाला ते वाजवीत बसायचे असेल, तर खुश्शाल बसा. 

" बुलेट ट्रेनमधे कुणीही बसणार नाही." ठीक आहे. हा काही वाद घालण्याचा विषय नव्हे. जेव्हां बुलेट ट्रेन सुरू होईल तेव्हां रिकामे डबे घेऊन धावत असलेल्या बुलेट ट्रेनचे फोटो इथे पोस्ट करा, मी तुमचे नांव पद्मश्री करता सुचवेन.  (बाय-द-वे, चंद्र यान -२ तुमच्या निशाण्यातून कसे सुटले ?. त्यात खरोखरीच कुणीही बसणार नाही)