१. " कोण म्हणाल कि  मोदी सोडता या देशात कुणीही व्यक्ती पंतप्रधान व्हायला  लायक नाही ?"

मोदी नाही तर कोण ? या  एका प्रश्नावर तर मोदीभक्तांनी  सगळ्या विचारवंताना मूर्ख बनवलं !  वाट्टेल ते उमेदवार, बिजेपीच्या सर्व योजनांचा बोजवारा उडाला असतांना सुद्धा,  जनतेनं निवडून दिले ! काय तर म्हणे " मोदींना पंतप्रधान करायचं, भले उमेदवार कितीही भिकार असू दे " काय  हा तर्क ?  लोक विसरुनच गेले की चांगला उमेदवारच चांगला पंतप्रधान निवडून देऊ शकतो. तुम्ही वाचन वाढवा !

२. ना खाऊंगा ?  राफेल डीलमध्ये खोटी प्रतिज्ञापत्र  सादर केल्यामुळेच तर सुप्रिम कोर्टानी फेरविचार याचिका दाखल करून घेतली ! मोदींचा सर्व प्रकरणात हस्तक्षेप द हिंदूनी पुराव्यासकट  उघड केला.  तुम्हाला कोणत्याही प्रकरणाची काहीही माहिती दिसत नाही.

३. बुलेट ट्रेनमधे कुणीही बसणार नाही, तो फक्त जगाला दाखवायचा प्रकार आहे  असं खुद्द मोदी म्हणाले आहेत.  चंद्रयान हे प्रवासी वाहातुकीसाठी आहे  म्हणून तुम्ही त्याची बुलेट ट्रेनशी तुलना करत असाल तर तुमच्या ज्ञानाची कमाल आहे !