ते मला पण कळत. संजय यांना फक्त मोदीविरोधाचे तुणतुणे वाजवायचे आहे येवढेच नव्हे, तर तेही अत्यंत अपमानकारक भाषेत. जसे कधी विमानात बसायला न मिळाल्यासारखं जगभर फिरून घेतलं, देशाचाच पैसा उधाळायचा म्हटल्यावर आपल्या डॅडींचं काय जातंय या स्टाईलमधे .. प्रधानमंत्रीच्या कोणत्याही कृत्या बद्दल टीका करयाची असली - मग ते मोदी असोत वा इतर कोणी - तरी शब्द काय वापरावेत याचे काही तारतम्य बाळगणे गरजेचे असते. टीका आणि अपमान, यात फरक अहे. पण संजय तेवढाही संयम पाळीत नाहीत.
तर, संजय यांच्याशी वाद घालून काहीही निष्पन्न होणार नाही हे मला पण कळत. पण दोन गोष्टीं करता मात्र आपण सर्वांनीच संजय यांचे आभार मानायला हवेत. ते म्हणजे,
१ - त्यांच्या मुळे मनोगत वर रोज काहीतरी नवीन पोस्ट होत राहत. :-). अन्यथा आठवडेच्या आठवडे "गद्य" स्तंभात काहीही लिखाण होत नाही.
२- त्यांचे पोस्ट वाचून तेवढीच करमणूक होते. अन्यथा हल्ली मराठीत विनोदी लिखाण जवळ जवळ बंदच झाले आहे. म्हणून : संजय - चालू द्या. तुमचे विचार कितीही अर्थशून्य आणि तर्कशून्य असले, तरी चालू द्या. आपण दोघे, व अधून मधून इतर कोणी, मनोगत जिवंत ठेवूया.