हा विडीयो २०१३ सालचा आहे. तेव्हां ते प्रधानमंत्री नव्हते; व बुलेट ट्रेनचा प्रकल्प पण नव्हता. २०१९ साली हा विडीयो पाहून लोकांनी मते दिलेली नाहीत. तरी पण, शब्द नीट ऐका.  "दुनिया को हमारी ताकत का परिचय होगा. ट्रेन से वो कोई बैठने आनेवाला नही है". म्हणजे 
१ - जगाला आपल्या ताकतीची जाणीव होईल
२- (जरी) त्यात ते कोणी (म्हणजे, परदेशी) बसायला येतील असे नसले तरी.

यातला पहिला मुद्दा, जगाला आपल्या ताकतीची जाणीव करून देणे. असे म्हणता येईल की लोकांनी मोदींना मते का दिली त्या करता हा एकच मुद्दा पुरेसा होता.
१- १९९९ मध्ये भारतचे दोन सैनिक अधिकारी, अहूजा, आणि कालिया, पाकिस्तान ने पकडले, व त्यांचे हाल हाल करून त्यांना ठार मारले. पण आता अभिनंदन बरोबर तसे काही करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही, कारण पाकिस्तानला माहीत होते, 2018 चा भारत वेगळा आहे. आणि अभिनंदनला पाकिस्ताने बिना-शर्त भरताच्या स्वाधीन केले.
२- परवाच लागलेल्या कुलभूषण जाधवच्या निकालात आंतरराष्ट्रीय कोर्टांच्या प्रत्येक मुद्द्यवर निकाल भारताच्या बाजूने 15 विरुद्ध १, असा लागलेला आहे. विरुद्ध जे एक आहेत ते जज पाकिस्तानचेच. पण लक्ष देण्याचा मुद्दा असा, कि इतर १४ देशांचे जाउद्या, पण एक जज चीनचे होते, त्यांनी सुद्धा प्रत्येक मुद्द्या वर भारताच्या बाजूने निकाल दिला. आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनने पाकिस्तानच्या विरोधात व भारताच्या बाजूने उभे राहणे म्हणजे काय, हे तुम्हाला कळेल असे वाटत नाही, आणि कळले तरी ते तुम्ही मान्य करणार नाही. हा मोदींच्या गेल्या पाच वर्षातील डिप्लोमसीचा परीणाम आहे. (ज्याला तुम्ही "विमानातून हिंडणे" म्हणता) 

दुसरा मुद्दा - त्यात ते कोणी (म्हणजे, परदेशी) बसायला येतील असे नसले तरी. बरोबरच आहे. परदेशी लोक काही बुलेट ट्रेन मध्ये बसायला म्हणून भारतात येणार नाहीत. याचा अर्थ "कोणीही बुलेट ट्रेन मध्ये बसणार नाही" असा अजिबात होत नाही. 

क्षणभर समजा जरी मोदी अस म्हणाले कि बुलेट ट्रेन मध्ये कोणी बसणार नाही, तरी ते वाक्य घोळून घोळून तुम्ही बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प कसे बनतात या बाबत तुमचे अफाट अज्ञान जाहीर प्रकट करण्याची तुमची येवढी इच्छा असेल तर अवश्य करा. प्रधानमंत्रींनी आज्ञा दिली आणि लागले सगळे बुलेट ट्रेन बनवायला असे होत नसते. एक विस्त्रुत डीपीआर बनवावा लगतो, त्यावर अनेक प्रकारच्या मंजूऱ्या घ्यावा लागतात, एकूण प्रकल्पाची किंमत, त्याचा उपयोग,"फायनानशियल रिटर्न" , कॉस्ट-बेनेफिट रेशो, वगैरे.  त्यातून या प्रकल्पा करता तर  जपान कर्ज देत आहे. ते असे भारतातील कोणाच्या लहरी करता कर्ज देत नसतात. 

तरी सुद्धा मोकळ्या धावत असलेल्या बुलेट ट्रेनचे फ़ोटो इथे यथावकाश पोस्ट करावेत. आम्ही वाट पाहू.