एक कुणाचीतरी पर्स अमच्या इमारतीच्या गच्चीपाशी सापडली. कुणी चोराने ती तिकडे नेऊन उघडून पैसे काढून टाकलेली असावी. आतमध्ये बऱ्याच किल्ल्या होत्या. एक पत्ताही सापडला. मी काही खटपटीत पडलो नाही. शहराच्या त्या भागात राहणाऱ्या मित्रास बोललो. तो म्हणाला "चाव्या आणून दे मी पोहोचवतो." अरे नसता उपद्वयाप नको." तरीही त्याच्या आग्रहाखातर दिल्या. यामध्ये तीन चार दिवस गेले. नंतर तो भेटला तेव्हा एक मोठी श्टोरी कळली. "फुकटचा मनस्ताप. कील्ल्या द्यायला जायलाच नको होतं."