हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेतील चित्रपट / साहित्य/ काव्य इत्यादी मराठीत डब/ अनुवाद झाल्यास मराठी वाचक/प्रेक्षक जागे होतील. त्यांना कळेल कि इतर भाषांत पण उत्तोमोत्तम साहित्य वगैरे आहे, काही तर मराठी पेक्षा सरसच आहे. याचे परिणाम फार गंभीर होउ शकतात. सदाशिव पेठेच्या बाहेर पडले कि कसे खाडकन डोळे उघडतात, पुणे तेथे बरेच काही उणे हे ध्यानात येते, तसेच.  आपला तो बाळ्या नाही, व इतरांचे ते कार्टे पण नाही ही जाणीव पचवणे अवघड असते. म्हणून, इतर कोणत्याही भाषेतील चित्रपट मराठीत अजिबात डब करू नयेत. देवांनाही हेवा वाटावा अशी मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आपल्याला लाभले, याच विचारात मश्गूल राहावे.