एकूण उहापोह वाचायला मजा आली !

 प्रवाहणाने ब्रह्माला " कल्पना " म्हटल्यामुळे किंवा अनेक बाबा- बुवा  " भोळ्या जनतेला लुटतात " यावरून " ब्रह्म नाही " असा निष्कर्ष निघत नाही. त्यावरून फारतर प्रवाहणाला ते समजलं नाही किंवा एखादा बुवा आपलं भलं करेल या लोभापायी जनता लुटली जाते असा अर्थ निघतो.

ब्रह्म नाकारणं म्हणजे माशानं समुद्र नाही म्हणणं आहे; कसं ते पाहा : 

ॐ पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात् पूर्णमुदच्युते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:

याचा अर्थ ब्रह्म पूर्ण आहे > त्या  ब्रह्मातूनच माझी उत्पत्ती झाल्यामुळे मी देखिल पूर्ण आहे > कारण पूर्णातून पूर्णच उत्पन्न होतं ।

थोडक्यात, मासा समुद्रातून उत्पन्न झाला आहे आणि तो समुद्राचाच अविभाज्य भाग आहे, त्यामुळे समुद्र जसा पूर्ण आहे  तसाच मासाही पूर्णच आहे. मासा स्वतःला वेगळा (आणि त्यामुळे अपूर्ण समजत असला तरी) वस्तुस्थिती तशी नाही. 

आणि यापुढे तर वरच्या श्लोकात बुद्धिमत्तेची कमाल आहे !

पूर्णाचा जरी पूर्णात विलय झाला तरी >  पूर्णच कायम राहतं ! ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:

म्हणजे मासा जरी यथाकाल समुद्रात विलीन झाला तरी समुद्र कायम तसाच आहे !

ब्रह्म काय आहे ते समजण्यासाठी मी हे वर्णन रूपकात्मक केलं आहे.  देह आणि आकाश यांची त्या उदाहरणाशी सांगड घातली तर ब्रह्म काय आहे तो उलगडा होईल.