कुशाग्र
आपण ज्ञानी आहात, त्यामुळे आपल्याला खाली लिहिलेल्या गोष्टी माहिती असणारच. फक्त इतर वाचकांना माहिती व्हावी म्हणून लिहीत आहे.

जन्माधिष्ठित जातिव्यवस्था, ती कायम टिकावी यासाठी निर्माण केलेला कर्मविपाक सिद्धांत, त्यामुळे आलेली उच्चनीचता, स्त्रिया आणि दलित यांची गुलामगिरी वगैरे वाईट गोष्टी हा एक भाग आहे आणि विश्वाचे नेमके स्वरूप काय आहे, जे आज डोळ्याला दिसते तेच खरे कसे कारण विश्वाचे स्वरूप दर क्षणाला बदलते, यामागे काही शाश्वत, न बदलणारे तत्त्व-मग त्याला आत्मा म्हणा की ब्रह्म- आहे का याविषयीची चर्चा हा दुसरा भाग आहे. यातला पहिला भाग हा दुर्दैवाने समाजजीवनाचे अंग बनला होता.  तो चुकीचा आहे, चुकीच्या -म्हणजे बरोबर आहे हे कधीही सिद्ध न करता येण्यासारख्या, पण तर्काने सहज खंडन करण्यासारख्या-पायावर आधारित आहे, हे खरे आहे.  तो कालबाह्य होऊन समानता येत आहे.

दुसरा भाग हा फक्त तत्त्वज्ञानाच्या पातळीवरचा आहे आणि उपनिषदांमधील त्याबद्दलची मांडणी अतिशय तर्कशुद्ध आहे.
क्दाचित भाषा वेगळी असेल, पण आजच्या भाषेत सांगायचे तर ब्रह्म म्हणजे विश्व व्यापून असलेली मास आणि एनर्जी, पूर्वीच्या भाषेतले जड आणि चैतन्य.   आत्मा अमर आहे किंवा ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे हा नियम म्हणजे माझ्या मते आजचा  प्रिंसिपल ऑफ काँझरवेशन ऑफ मास अँड एनर्जीचा नियम.

यातला मुख्य भाग असा आहे की मी स्वतः या तत्त्वाचा भाग आहे हे जाणणे. आपण देह नसून आत्मा किंवा ब्रह्म आहोत.
कारण हा देहाचा आकार जास्तीत जास्त शंभर एक वर्षे टिकेल. त्या आधी काय होते आणि नंतर काय राहते हा कठोपनिषदातला प्रश्न आहे. 
"आदावंते च यन्नास्ती वर्तमाने पि तस्थता" असे एक ब्रह्मसूत्र आहे. याचा अर्थ विश्वाच्या सुरुवातीला जे नव्हते आणि शेवटी जे नसेल ते आजही नाही. म्हणजेच मी जर आज असेन तर मी देहाबरोबर जन्मलेलो नाही आणि
देहाबरोबर नाशही पावणार नाही, म्हणून मी आत्मा आहे आणि मी अमर आहे.

राहुल सांकृत्यायन काय किंवा इतर पुरोगामी काय,  वरील पहिल्या वाईट भागाची सांगड दुसर्‍या चांगल्या भागाशी घालून सर्वच कसे वाईट आहे हे सांगतात.

संजय
याबाबतीत मनापासून १००% सहमत.