साधना काय करणार ? जे आहेच ते घडणार कसं ? चालणं ही क्रिया पण थांबणं ही स्थिती आहे. थांबणं करणार कसं ? त्यामुळे प्रश्न साधनेचा नाही, समजण्याचा आहे. जनकाला लगेच समजलं कारण त्याला व्यक्तिमत्त्वाचा फोलपणा आधीच लक्षात आला असणार. त्यारपता दुसरा मार्गच नाही. व्यक्तिमत्त्वातून सुटका म्हणजे स्वरूपोलब्धी ! आपण व्यक्तिमत्त्व सोडायला तयार नाही आणि आजूबाजूचे ते क्षणोक्षणी आपल्यावर ठसवत राहतात, हा खरा प्रश्न आहे.