काहीही न करता. त्यामुळे काही करून कसं मिळेल? जे आहेच ते मिळवायचा प्रश्नच नाही. आकलनाचा आहे.पण "समझ की कमी" प्रमाणे जनकाला इतक्या पटकन कसे समजले असेल असा विचार आला.
तुमच्या उत्तराने २-३ गोष्टी क्लिअर झाल्या. ज्या अदरवाइज कळाल्या असत्या की नाही माहीत नाही.
१) अध्यात्म हि कोणती 'सिस्टम' किंवा 'कंपल्शन' नव्हे. तो आपापला चॉइस आहे. आणि सगळ्यांसाठी ते सेम आहे. कुणालाही ग्रेट मानण्याचे काही कारण नाही. काही करून समजलेच पाहिजे असे काही नाही आणि समजले नाही तरी निराश होऊ नये.
२) सिद्धांनी सांगितलेल्या गोष्टी जरी ऍब्सोल्यूट असल्या तरीही त्या गाइडलाइन्स म्हणून घ्याव्यात कारण कोणालाही कसाही उलगडा होऊ शकतो. हा स्वतःचा स्वतः प्रवास आहे.
३) अध्यात्म हे प्रत्येकासाठी नव्यानं सुरू होतं. आधी कुणी काय सांगितलं किंवा परंपरा याचा संबंध नसतो ( ते उपयोगी पडतंच मात्र ).