१. सत्य ही उघड गोष्ट आहे. एकदा माझा मित्र मला विचारत होता " हे नैनं च्छिंदंती " काय आहे ? मी म्हटलं " हे काय, समोर ! " आणि त्याला निराकार दिसला ! इतकी  साधी गोष्ट आहे. 

२. अध्यात्म हा विकल्प आहे. सत्य समजलं नाही म्हणून कुणी असत्य होत नाही त्यामुळे नाराजीचं काही कारणच नाही.

३.  सिद्धांच्या गोष्टी पारखून घ्यायला हव्यात कारण योग्य अयोग्य आपणच ठरवतो. एक साधा नियम मात्र सर्वत्र लागू होतो " जे तुम्हाला तत्क्षणी स्वतःशी जोडतं ते योग्य "

४)  सत्य एक असलं तरी आध्यात्मिक प्रवास प्रत्येकासाठी वेगळा आहे कारण व्यक्तिमत्त्वापासून मुक्ती म्हणजे सिद्धत्त्व ! आणि प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व एकमेव आहे त्यामुळे प्रत्येक गुंता व्यक्तिसापेक्ष आहे.