पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या खपाचा राष्ट्राच्या  आर्थिक स्थितीशी प्रत्यक्ष संबंध आहे. हा निष्कर्श चुकिचा आहे.  पुरुषांच्या अंतर्वस्त्रांचा खप कमी होण्याचे प्रमुख कारण हे आहे कि चड्डी-बनियान यांचा दर्जा सुधारला आहे, व आता ती जास्त काळ टिकतात. राष्ट्राच्या  आर्थिक स्थितीशी प्रत्यक्ष संबंध स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांच्या खपाचा आहे, कारणे दोन.

एक - स्त्रिया गरज आहे म्हणूनच खरेदी करतात, असे नाही. (आणि, हे व्यवस्थापन शास्त्रात सर्व मान्य सत्य आहे. म्हणून तर डिपार्टमेंट स्टोअर मध्ये स्त्रियांच्या कपड्यांचे दालन नेहेमी तळमजल्या वर, प्रवेश केल्या केल्या समोरच, असते.  पुरुष शर्ट-पँट तेव्हांच घेतो जेव्हां त्याला गरज असते. व गरज असते तेव्हां तिसऱ्या, चवथ्या, . . . ज्या कुठल्या मजल्यावर पुरुषांच्या कपड्यांचे दालन असेल, तेथे जाईल, व खरेदी करेल. पण स्त्रिया अनेकदा खरेदी केवळ "समोर दिसले", म्हणून पण करतात. त्यांच्या कपड्यांचे दालन तिसऱ्या, चवथ्या, . . . मजल्यावर ठेवले, तर स्त्रिया पण फक्त तेवढीच खरेदी करतील जेवढी गरज आहे. इंपल्सिव खरेदी होणार नाही. म्हणून, समोर तळ मजल्या वर. तर हे व्यवस्थापन शास्त्रात सर्व मान्य सत्य आहे, यात स्त्री वर्गाचा कोंणताही अपमान नाही, व माझा पत्ता माहीत करून माझ्या घरावर मोर्चा वगैरे आणू नये.)  आणि गरज नसताना होत असलेली खरेदी ही अर्थ व्यवस्थेच्या उत्तम स्थितीची द्योतक आहे. 

दोन - स्त्रियांच्या वस्त्रात नफा जास्त असतो. साधारणतः कोणत्याही कपड्याची किंमत त्यात किती कापड लागते, या वर अवलंबून असते. शर्ट करता कापड घेताना आपण विचारतो "किती मीटर लागेल? ". हाफ-शर्ट पेक्षा फुल शर्टला कापड जास्त लागेल म्हणून फुल शर्टला जास्त पैसे पडतील. दहा बाय सहा मापाचा गालिचा सहा बाय चार मापाच्या गालिच्या पेक्षा महाग असणार हे पाचवी पर्यंत गणित शिकलेला पण सांगेल. पण स्त्रियांच्या अंतर्वस्त्राच्या बाबतीत हे गणित सपशेल फसते. त्यात कापड फारच कमी लागते, पण तरी ही किंमत खूप जास्त असते. किंबहुना, प्रमाण व्यस्तच असते. कापड जितके कमी, किंमत तितकी जास्त. (पुन्हा एकदा, हे पण निर्विवाद सत्य आहे. यात स्त्री वर्गाचा कोंणताही अपमान नाही. फुटपट्टी घेऊन पुरुषांच्या व स्त्रियांच्या अंतर्वस्त्राचे क्षेत्रफळ काढावे; त्याने किमतीला भागाकार करून "प्रती चौरस इंच" किंमत काढावी, व खात्री करून घ्यावी. माझा पत्ता माहीत करून माझ्या घरावर मोर्चा वगैरे आणू नये)  तर,  "प्रती चौरस इंच" किंमत जास्त असल्याने नफा जास्त असतो, व अर्थ व्यवस्था मजबूत होण्यास मदत होते.

ता. क. हे ग्रीनपीस, भारतात खाण उद्योग, धरणे, अणु-शक्ती प्रकल्प इत्यादीला विरोध करतात. यांनि अंतरवस्त्र या विषयात लक्ष घालण्या सुरुवात केली असेल, तर चांगली गोष्ट आहे. भारतात रखडलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागतील.