पुणे हे र्हस्व-दीर्घ हमखास उलटे लिहिण्याचे शहर आहे. जसे लहान मुले पायात बूट डावे-उजवे हमखास  उलटे घालतात, तसेच.  पुण्यातील दूकानात दुध मीळते, उपहारगृहात स्विट डीश मीळते, वगैरे. आमच्या शेजारी एका कापडांच्या दुकानात तर "इथे बेड शिट मीळेल" अशी पाटी आहे. मला दिल्ली सोडून पुण्यात येवून आता बारा वर्षे झाली. तरी पण र्हस्व-दीर्घ मध्ये मी जर एक पण चूक केली नाही, तर पुणेकर मला "पुणे लांच्छन" असा पुरस्कार देतील.