याचा अर्थ अज्ञानी लोकांनी मोठा मजेशीर लावला आहे. जग्न्मिथ्या याचा अर्थ जग खोटं आहे किंवा भ्रामक आहे असा होत नाही. तर प्रत्येक आकार जो प्रकट झाला आहे तो कालौघात नष्ट होईल असा आहे परंतु निराकार (किंवा ब्रह्म) निर्माणच झालेलं नाही, ते आहेच त्यामुळे ते नष्ट होण्याचा प्रश्नच नाही. एक साधं उदाहरण सर्व उलगडा करेल, शांतता निर्माण झालेली नाही, ती ध्वनी निर्माण होण्यापूर्वी होती, तिच्याशिवाय ध्वनी निर्मितीच होऊ शकत नाही. आता कितीही मोठा ध्वनी झाला तरी तो कालबद्ध असेल आणि यथावकाश तो शांततेच लयाला जाईल परंतु शांतता कधीही नष्ट होणार नाही. म्हणून ब्रह्म सत्य असं म्हटलंय.