कारण प्रत्यक्ष श्रीकृष्णानीच सांगितले आहे "वासांसि जीर्णानि ----- " शिवाय अर्जुनाने " हे विवस्वानाने मनूला वगैरे सांगितले म्हणतोस . तू तर आजचा आणि विवस्वान तर फार पूर्वीचा मग हे तुला कसे कळले  ? " (म्हणजे त्यावेळपर्यंत अर्जुनही  पुनर्जन्म, ब्रह्म याविषयी अनभिज्ञ होता असे दिसते , त्यामुळेच व. पु. काळे यांना "आपण सारे अर्जुन (ज्यात मीही आलो)" असे पुस्तक लिहावेसे वाटले.) त्यावर "बहूनि  मे व्यतीतानि ---" हे उत्तर दिले यावरून पुनर्जन्म हे थोतांड मानणे हे चूक ठरेल तरीही आपण तसे मानता हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृणावर अविश्वास दाकवण्यासारखे नाही का ?
        शिवाय या मालिकेतील अगदी पहिल्या लेखापासून हे माझे मत असे मी म्हटले नाही. मी ब्रह्म म्हणजे काय याचा  शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यात वाचायला किंवा ऐकायला मिळालेली मते मी उद्धृत केली आहेत. म्हणजे मला तीच मान्य आहेत असा अर्थ होत नाही. मला अजून शोध लागला नाही व ते कळण्याइतका मी महान नाही असेच मी म्हणत आलो आहे. त्यामुळे ब्रह्म म्हणजे खुद्द मीच हेही मला जाणवले नाही आणि कदाचित शेवटपर्यंत जाणवणारही नाही.राहुल सांकृत्यायन म्हटल्याप्रमाणे असेल (तसे आहे असे मी  म्हणत आहे असे नाही) तर तो शोध करणे विफल आहे असे माझ्यासारख्या अज्ञान्यास वाटते येवढेच नमूद केले आहे.