कृष्णानं लोकांना दिलासा मिळावा म्हणून तसं म्हटलं असेल. पुनर्जन्म ही कल्पना सद्यकालात बाद ठरते कारण व्यक्तिमत्त्वाची साठवण फक्त मेंदूत असते आणि मृत्यू तो संपूर्ण डेटा फॉर्मॅट करतो. क्वचित डेटा पूर्ण फॉर्मॅट न झाल्यानं तो दुसऱ्या मेंदूत पेस्ट होऊ शकतो पण दुसऱ्या व्यक्तीचा पहिल्या व्यक्तीशी सुतराम संबंध नसतो. अर्थात, डेटाविषयी इतकी अद्ययावत माहिती कृष्णाच्या काळात उपलब्धही नव्हती.
> राहुल सांकृत्यायन म्हटल्याप्रमाणे असेल (तसे आहे असे मी म्हणत आहे असे नाही) तर तो शोध करणे विफल आहे असे माझ्यासारख्या अज्ञान्यास वाटते येवढेच नमूद केले आहे.
राहुल सांकृत्यायनला ब्रह्म समजलं नाही याचा अर्थ ते नाही असा होत नाही. ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रश्नच नाही कारण तो शोध नसून उलगडा आहे. ज्याप्रमाणे स्वतःच्या हातानं तो हात धरणं असंभव आहे त्याप्रमाणे ब्रह्माचा शोध घेणं अशक्य आहे. कारण जे सापडलं ते ब्रह्म आहे असं मानलं तरी शोधणारा कोण ? हा प्रश्न कायम अनुत्तरितच राहिल.