पण लिहिण्याचा नादात (नेहमी प्रमाणे) ते तुमच्या लक्षात आलेलं नाही.

प्रकाश पोहोचण्यासाठी कोणतंही माध्यम लागत नाही.  ज्या अवकाशातून प्रकाश प्रवास करतो त्यालाच ब्रह्म म्हटलं आहे.  माझे प्रतिसाद नीट वाचले तर (कदाचित) तुम्हालाही प्रकाश पडेल. ब्रह्म हा शब्द आहे, सामान्यतः प्रत्येक शब्द फक्त निर्देश असतो, पण शब्द म्हणजे निर्देश केलेली गोष्ट नसते.  ब्रह्म या शब्दानं निर्देश सुद्धा होत नाही कारण ब्रह्म हा आकार नाही त्यामुळे ते नक्की कुठे आहे ते दर्शवता येत नाही. किंवा ते इतकं सार्वभौम आणि अखंड आहे की ते नाही अशी कोणतिही जागा नाही.