ब्रम्ह हा फक्त शब्द आहे, आणि ब्रम्ह हेच सत्य आहे. म्हणजे, शब्द हेच फक्त सत्य आहे. बरोबर?
म्हणजे, मी स्वतः, मला खिडकीतून समोर दिसत असलेली इमारत, त्या बाजूची झाडे, मी ज्या वर बसलो आहे ती खुर्ची, सकाळी प्यायलेला चहा, एसेमेप्रेझोल 20 मिलीग्रॅम ची गोळी, . . . हे सर्व शब्द नाहीत.या वस्तू आहेत. शब्द नाहीत, म्हणून ब्रम्ह नाहीत, आणि म्हणून सत्य पण नाहीत. बरोबर ?