काही एक फरक पडत नाही, तरी पुन्हा प्रकाश टाकतो.

शांतता हा शब्द आहे पण वास्तविकात शांतता ही शब्द निर्माण होण्यापूर्वीची स्थिती आहे.  शांततेशिवाय शब्द निर्माणच होऊ शकणार नाही.  शब्द स्थान आणि काल बद्ध आहे पण शांतता सार्वभौम आहे.  शब्दामुळे शांतता खंडीत झाल्याचा आभास होतो पण शांतता कायम अभंग आहे कारण ती निर्वस्तू आहे.  शांतता सिद्ध करा असं म्हणणं निर्बुद्धपणाचं होईल कारण  ती स्वयंसिद्ध आहे. कोणताही शब्द ती सिद्ध करू शकत नाही. शांतता हे ब्रह्माचं एक रूप आहे. तस्मात, शांतता न मानणं  किंवा सिद्ध करून दाखवा म्हणणं जितकं निर्बुद्धपणाचं  होईल तितकंच ब्रह्म नाही किंवा सिद्ध करा म्हणणं आहे.